हदगाव: सुप खारट झाल्याच्या कारणावरून चक्री शिवारात बार चालकास काठीने मारहाण करून जवळपास पंधरा जणांनी गंभीर दुखापत केली
Hadgaon, Nanded | Oct 25, 2025 नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौ.चक्री शेत शिवार मैत्रीबार येथे दि २२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास यातील आरोपी १)शिवाजी बंडे २)शिवाजी देशमुख ३)प्रशांत शिंदे व इतर १२ इसाम यांनी सुख खारट झाल्याच्या कारणावरून गैर कायद्याची मंडळी जमून यातील फिर्यादीस शिवीगाळ करून डोक्यात काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी फिर्यादी रामेश्वर गिर्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी हदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू