लातूर: बुलेट ट्रेनसाठी कोटींचा खर्च,शेतकऱ्यांना मदतीला पैसे नाहीत!आ.अमित देशमुख यांची सरकारवर टीका,सोशल मीडियावर व्हिडिओव्हायरल
Latur, Latur | Oct 7, 2025 राज्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असतानाही, सरकार केवळ आश्वासनांवर वेळ काढत आहे, अशी घणाघाती टीका आमदार अमित देशमुख यांनी केली.शासन म्हणते की, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी "पैशाचे सोंग करता येत नाही", पण याच सरकारने बुलेट ट्रेन, शक्तीपीठ, महामार्ग यांसारख्या प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मग शेतकऱ्यांसाठी हेच पैसे का उपलब्ध होत नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदार अमित देशमुख म्हणाले, "शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सरकार गंभीर नाही.