कराड: कराड दक्षिण मतदारसंघात बोगस मतदान प्रकरणी प्रशासनाचे दुर्लक्ष; गणेश पवार यांची दिवाळीची पहिली आंघोळ प्रशासनाच्या दारात
Karad, Satara | Oct 20, 2025 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कापील येथे बोगस मतदान होऊन देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करत दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, अगदी प्रांताधिकार्यांवर देखील कारवाई होत नाही म्हणून प्रशासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता दिवाळीची पहिली अंघोळ प्रशासनाच्या दारात केली. कापिल गावामध्ये रहिवासी नसलेल्या लोकांनी कापिल गावच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी करून मतदान केले आहे.