नागपूर शहर: कळमना मार्केटमधील मोबाईल चोरटा अटकेत; ६ मोबाईल आणि दुचाकी जप्त: प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 30 मे ला दुपारी 4:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार,कळमना मार्केटमध्ये वाहनांमध्ये झोपलेल्या चालकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारींवरून पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. कळमना पोलिसांच्या डीबी पथकाने गस्तीदरम्यान २४ वर्षीय आरोपी केशव अशोक शाहू याला अटक केली. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे