नागपूर शहर: उपराजधानी पुन्हा रक्तरंजित ! पाचपावलीत ६५ वर्षीय वृद्धेची घरातच गळा चिरून निर्घृण खून
उपराजधानी नागपूरमध्ये गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला असून खुनाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. शहरात सातत्याने घडणाऱ्या या थरारक गुन्ह्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.