समुद्रपूर: गिरड परीसरात दहशत निर्माण करणाऱ्या वाघाचे पुन्हा नागपूर जिल्ह्यात पलायन:शोध कार्य सुरू:वनविगाभाची माहिती
गिरड परीसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका वाघाला जेरबंद करण्याची परवानगी मिळाला आहे.या वाघाच्या मार्गावर वनविभागाचे ५० वर अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस असुन या जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर पर्यंतन करीत आहे.१५ दिवसांनंतर पुन्हा या वाघाने आपला मोर्चा खुर्सापार जंगल परिसरात वळवला आहे.यामुळे चार दिवसापासून वनविभागाचे अधिकारी कर्मचारी पुन्हा वाघाला जेरबंद करण्यासाठी पर्यंतन करीत असताना दोन दिवसापासून वाघाचा पत्ता नाही यामुळे या वाघाने नागपूर जिल्ह्यात पलायन केले असावे अशी माहिती दिली आहे