नागपूर शहर: जरीपटका परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, उष्मघातामुळे मृत्यू झाल्याची आशंका
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना १३ मे रोजी सकाळी ८:२७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.नारा गाव येथील जे.पी. लॉनसमोरील मोकळ्या मैदानात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी मेयो हॉस्पिटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. जरीपटका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.