भिवंडी: काल्हेर येथे लिफ्टमधून नाती सोबत जाणाऱ्या वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून चोरटा पसार, थरारक सीसीटीव्ही आलासमोर
Bhiwandi, Thane | Oct 19, 2025 भिवंडीच्या काल्हेर परिसरामध्ये एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे. वयोवृद्ध महिला लिफ्ट मधून आपल्या छोट्या नाती सोबत जात होती तिचा पाठलाग करत चोरटा आला. लिफ्टच्या दारात उभा राहून महिलेच्या दागिने खेचून चोरटा पसार झाला. महिलेने आरडाओरड केली मात्र तोपर्यंत तो तेथून पळून गेला होता. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.