जालना: जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजीला मनाई; साठा करणार्यावर कारवाई करणार; जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश
Jalna, Jalna | Apr 1, 2026 जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची अवैध साठेबाजी, दरवाढ आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. बुधवार दि. 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या आदेशानुसार अन्नधान्य, कडधान्ये, किराणा वस्तू, पेट्रोल, डिझेल,घरगुती गॅस तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची विनापरवाना किंवा मंजूर मर्यादेपेक्षा जास्त साठेबाजी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर केला.