Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: मुंबई-गोवा महामार्ग वृक्षांअभावी बनतोय रखरखीत

Alibag, Raigad | Apr 12, 2026
मुंबई-गोवा महामार्ग हा वाहतुकीच्या व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग असुन या महामार्गाच्या दुतर्फे लहान-मोठी वृक्ष होती. ती चौपदरीकरणाच्या कामात तोडण्यात आली यामुळे प्रवाशांसहित, शेतकरी, वाटसरू यांना असणाऱ्या सावलीचा आधार तुटला. शिवाय मुंबई-पुणे येथून कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही क्षणभर विश्रांतीसाठी वृक्षवल्ली उपयुक्त ठरत होती. परंतु सध्यास्थितीत तापमानाचा पारा चढल्यामुळे आजूबाजूला थोडयाप्रमाणात असणारी झाडे ही करपून गेली आहेत. यामुळे प्रवाश्यांना मिळणारी सावली हरपली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.