नागपूर शहर: मानकापूर पोलिसांकडून दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; चोरीची गाडी जप्त: हरेश काळसेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 10 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार मानकापूर पोलिसांनी तत्परता दाखवत दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे.