महागाव: सिमेंटने भरलेला भरधाव ट्रक चक्क गुंज येथील किराणा दुकानात शिरला, सुदैवाने दुचाकी चालक बचावला, घटनेचा व्हिडीओ वायरल
महागाव तालुक्यातील गुंज येथील एका किराणा दुकानात भरधाव ट्रक क्र. एमएच-३४ बीझेड-११७७ च्या चालकाचा भरधाव ट्रक वरून नियंत्रण सुटल्याने ट्रक चक्क गुंज येथील जयस्वाल किराणा दुकानात शिरल्याची घटना शुक्रवारी रात्री ११:३० वाजताच्या दरम्यान घडली. सदर अपघातात ट्रक चालक अर्जुन शेरे हा किरकोळ जखमी झाला. मात्र या अपघातात किराणा दुकानाचे दोन दुचाकीचे आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ आज दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाला.