पनवेल: बँक खात्याची माहिती घेऊन पैसे ट्रान्सफर केल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Panvel, Raigad | Nov 29, 2025 एअरफ्रायरची रद्द झालेल्या ऑर्डरविषयी तक्रार दिल्यानंतर फ्लिपकार्ट या कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून व्हॉट्सअँप व्हिडिओ कॉलद्वारे मोबाइलचा एक्सेस घेऊन आणि बँक खात्याची माहिती घेऊन 70 हजार 184 रुपये ट्रान्सफर केल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. योगेश प्रभाकर मोहन (कमांडर रेनी सन्स बिल्डिंग, नेरे) यांनी फ्लिपकार्टवर एअरफ्रायरची ऑर्डर दिली. त्यांनी गुगल पेवरून पेमेंट पाठवले. त्यांची ऑर्डर अचानक रद्द झाली. यावेळी त्यांनी एक्स वेबसाईटवरील अकाउंटवरून फ्लिपकार्टच्या वेबसाईटच्या नावे तक्रार करून फ्लिपकार्ट यांना टॅग केले. त्यानंतर संपर्क केला असता व्हिडिओ कॉल करून अँप दाखवण्यास सांगण्यात आले.