मोर्शी: संत गजानन महाराज देवस्थान शिंभोरा रोड मोर्शी येथून निघालेली, पायदळ वारी शेगाव कडे रवाना
संत गजानन महाराज देवस्थान सिंभोरा रोड मोर्शी येथून, आज दिनांक 13 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता निघालेली पायदळ वारी शेगाव कडे रवाना झाली असून, परिसरातील भक्त मंडळीचा मोठा सहभाग असलेली ही पायदळ वारी आठ दिवस पायदळ चालत शेगाव येथे पोहोचणार असल्याचे कळते. सुमारे 300 भक्त मंडळीचा सहभाग असलेल्या या पायदळवारीत युवा वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी असल्याचे दिसून आले. गेल्या अनेक वर्षाची असलेली परंपरेनुसार ही पायदळ वारी काढण्यात आली असल्याचे सांगण्यात आले