नागपूर शहर: धक्कादायक! खेळताना गळ्याला ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 28 एप्रिल ला आझमशाह चौकात राहणारा हाशीर शाह (वय १३) हा सातवीतील विद्यार्थी आपल्या आजोबांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर खेळत होता.खेळत असताना अचानक त्याच्या गळ्याभोवती ओढणी अडकली आणि त्याला गळफास बसला. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ मेयो रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.