नागपूर शहर: नागपुरात 'ठाकूर गँग'चा हैदोस; रामदासपेठ परिसरातील हॉटेलवर कुऱ्हाडीने हल्ला, थरारक सीसीटीव्ही फुटेज वायरल
नागपूरमधील रामदासपेठ परिसरातील 'श्री साई रेस्टॉरंट'वर 'ठाकूर गँग'ने शस्त्रांसह हल्ला करून मोठी तोडफोड केल्याची घटना पहाटे घडली आहे. एका किरकोळ वादानंतर सुमित ठाकूर आणि त्याचे साथीदार दोन वाहनांमधून बेसबॉल बॅट आणि कुऱ्हाडीसारखी घातक शस्त्रे घेऊन हॉटेलमध्ये घुसले.