नागपूर शहर: नागपुरात गेस्ट हाऊसवर छापा: गांजासह तिघांना अटक : महेश पांडे, पोलीस उपनिरीक्षक
सक्करदरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पांडे यांनी 6 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार सक्करदरा पोलिसांनी मोठा ताजबाग परिसरातील 'खिदमत गेस्ट हाऊस'वर धाड टाकून साडेचार किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तस्करांना रंगेहाथ पकडले असून जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ७० हजार रुपये आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश पांडे यांनी दिली आहे.