तिरोडा: गोंदिया शहर प्रभाग क्रमांक 20 मधील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
Tirora, Gondia | Oct 15, 2025 गोंदिया शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया शहरातील श्री अनिल काकवानी व श्री तेजप्रकाश मनुजा यांनी पक्षाचा दुपट्टा वापरून प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत निश्चितच याचा फायदा मिळणार आहे.