भोकरदन: राजूर येथे श्री राजुरेश्वराच्या चरणी मंगळी चतुर्थी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी लावली उपस्थिती
आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन तालुक्यातील राजुर येथे श्री राजुरेश्वराच्या चरणी मंगळी चतुर्थी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावल्याचे दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले असून, याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती तसेच पोलीस प्रशासनाने सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.