नागपूर शहर: नागपुरात संतापजनक प्रकार! मेडिकल चौकात बुलेटस्वाराची मुजोरी; भररस्त्यात कार अडवून धरली
उपराजधानीतील मेडिकल चौकात गुरुवारी दुपारी रोड रेजची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बुलेटस्वाराने अज्ञात कारणावरून चक्क एका कारचा रस्ता अडवून धरत बराच वेळ गोंधळ घातला, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकल चौक परिसरातून एक पांढऱ्या रंगाची कार जात असताना एका बुलेटस्वाराने तिच्यासमोर आपली गाडी आडवी लावली. कार चालकाने पुढे जाण्यासाठी वारंवार प्रयत्न केले, मात्र बुलेटस्वार हटायला तयार नव्हता.