दहिवेल-साक्री या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी बिबट्या दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे .या परिसरात बिबट्या आढळला असून सर्वांनी रात्रीच्या वेळी दुचाकीवर सांभाळून प्रवास करणे आवश्यक आहे.सदर बिबट्या ज्या प्रवाशांना नजरेस पडला त्यांनी त्यांच्या कारमधून हा व्हिडीओ शुट केला असून सदर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.दहिवेल-कोंडाईबारी या भागात बिबट्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही म