लातूर: लातूरच्या विक्रम नगर मध्ये जीवघेणा हल्ला: माहिती अधिकार कार्यकर्ते विठ्ठल भोसले यांच्यावर लोखंडी रॉडने मारहाण
Latur, Latur | Nov 1, 2025 लातूर –लातूर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील गैरप्रकार, बोगस तुकडी घोटाळा आणि बेकायदेशीर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीविरोधात लातूर ते मंत्रालय आणि न्यायालयीन पातळीवर लढा देणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विठ्ठल उर्फ व्ही. एम. भोसले यांच्यावर आज शनिवारी दुपारी जीवघेणा हल्ला झाला.ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. विक्रम नगरमधील गजानन मंदिराजवळून जात असताना एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून येत लोखंडी रॉडने भोसले यांच्या उजव्या पायावर, पिंढरीवर, डाव्या गुडघ्याजवळ वार केले.