कल्याण: गोविंदवाडी बायपास रोड वरील दुभाजकावर म्हशी बांधल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी
Kalyan, Thane | Sep 29, 2025 काल दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे कल्याणच्या गोविंदवाडी परिसरामध्ये खाडीचे पाणी सुटले होते आणि परिसर पूर्ण पाण्याखाली गेला होता. नागरिकांची घरे आणि तबेल्यात मोठ्या प्रमाणात पाणी गेले होते त्यामुळे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले तसेच तबेल्यातील म्हशी देखील बाहेर काढण्यात आल्या. मात्र बांधायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर चक्क मस्त बेला चालकाने म्हशी गोविंदवाडी बायपास रोड वरील दुभाजकालगत बांधल्या. मात्र म्हशी रस्त्यावर बांधल्यामुळे बायपास रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आह.