रोहा: बेकायदेशीर ,अनधिकृत बॅनरमुळे नागरिक आक्रमक
शहिदांच्या स्तंभावर आणि प्रभू रामाच्या मंदिराला झाकलेले बॅनर
#janasamasya
Roha, Raigad | Oct 6, 2025 रोहा शहरात चक्क श्री राम मारुती चौक येथील स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्तंभावर आणि श्री प्रभू रामाच्या मंदिराला झाकून बॅनर लावलेले रोहेकरांच्या लक्षात आले. यानंतर रोहेकर नागरिक चांगले आक्रमक झालेले पाहायला मिळाले, सदर अनधिकृत बेकायदेशीर बॅनर वर गुन्हा दाखल करून सक्त कारवाई करण्याची मागणी रोहेकर नागरिकांनी केली आहे. आणि याच्यापुढे असा प्रकार घडणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याचे रोहा नगरपालिकेला आवाहन केले आहे.