लातूर: बाभळगाव निवासस्थानी नागरिकांची गर्दी; समस्यांवर तातडीने कारवाईचे आमदार अमित देशमुखांचे निर्देश
Latur, Latur | Nov 27, 2025 बाभळगाव येथील निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातील नागरिक, विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने भेटीस आले. नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करण्यासाठी आमदार अमित देशमुख यांनी सर्वांसोबत संवाद साधला.