नागपूर शहर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी अभिनेत्री हेमा मालिनी यांची सदिच्छा भेट
बॉलिवूडच्या 'ड्रीम गर्ल' आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच खासदार हेमा मालिनी यांनी आज नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान, नागपूरच्या धापेवाडा येथील होतकरू महिलांनी हातमागावर अत्यंत कौशल्याने विणलेली खास 'करवत काठी' साडी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी हेमा मालिनी यांना प्रेमाची भेट म्हणून दिली.