फुलउमरी येथे आरोग्य तपासणी शिबिर
1.2k views | Mangrulpir, Washim | Sep 25, 2025 वाशिम (दि.२५,सप्टेंबर): मंगरुळपीर तालुक्यात उपकेंद्र फुलउमरी येथे आज आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. डॉ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात एनसीडी, ॲनिमिया व सिकलसेल तपासणी, माता-बाल आरोग्य तपासणी (ANC/PNC) तसेच किशोरवयीन मुला-मुलींची तपासणी करण्यात आली. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना महत्त्वाच्या आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाल्या.