औंढा नागनाथ: पंचायत समिती लेखा विभागातील 57 लाखाच्या गैरवहार प्रकरणी तीन कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जिल्ह्यात खळबळ
औंढा नागनाथ येथील पंचायत समितीच्या लेखा विभागात कपातीच्या रकमेमध्ये झालेल्या 57 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात लेखा विभागातील तीन कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी नूकतेच काढले आहेत. या आदेशाने जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात औंढा पंचायत समिती लेखा विभागातील केएन इंगोले,जीएन वाघमारे,एव्ही मुळे यांच्या निलंबनाचे आदेश काढले तर नितीन शर्मा हा कर्मचारी यापूर्वीच निलंबित केल्याी माहिती 28 नोव्हेंबर रोजी प्राप्त आहे