वसई: नालासोपाऱ्यात अनेक संसार उघड्यावर,या कारवाईमुळे अनेक कुटुंबं बेघर, गरिमा गुप्ता या विद्यार्थिनीवर याचा खोल परिणाम.
Vasai, Palghar | Jan 23, 2025 नालासोपाऱ्यामध्ये सध्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु आहे. 34 बेकायद इमारती पाडण्यात येणार आहेत. आज सकाळी ११ वाजल्यापासून ही कारवाई केली जात आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात येत आहे.या तोडक कार्यवाहीमुळे दहावीत शिकणाऱ्या गरिमा गुप्ता हिच्या आक्रोशाने प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. गरिमा शिवसहाय गुप्ता, ही वसईतील जी जी जे वर्तक विद्यालयात दहावीची विद्यार्थिनी आहे, तिच्यावर या सर्व प्रकाराचा खोल परिणाम झाला आहे.