कर्जत: कर्जतमधील प्रकल्पामुळे आदिवासी, स्थानिक संस्कृती नष्ट होणार
Karjat, Raigad | Mar 25, 2026 सध्या देशपातळीवर पर्यावरणाविषयी अनेक ठिकाणी शासनाच्या चुकीच्या काही धोरणांमुळे नागरिकांचे हिताचा विचार न करता प्रकल्प लादले जात आहेत. अशा अनेक विविध प्रकल्पांना जनतेचा कडाडून विरोध होत असताना, मात्र आता या प्रकल्पांचे पेव हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातही उमटत असल्यामुळे कर्जतला निसर्गरम्य व पर्यटनस्थळ म्हणून लाभले नैसर्गीक वैभव व वरदान हे नष्ट होणार असल्याचे निदर्शनास येत असताना, अशा होणाऱ्या प्रकल्पांना कर्जतमधून कडाडून विरोध असताना, लवकरच प्रकल्प हटाव या मोहिमे अंतर्गत जनआंदोलन उभारले जाईल असा गर्भित इशारा अँड. कैलास मोरे यांनी दिलेला आहे.