जालना: खाजगी बसमध्ये घुसून तरुणीला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न; चालकाला मारहाण; औद्योगिक परिसरात गुंडगिरी
Jalna, Jalna | Jul 11, 2026 जालना शहरातील औद्योगिक परिसरात भरदिवसा गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खाजगी प्रवासी बसमध्ये प्रवास करणार्या तरुणीला जबरदस्तीने खाली उतरवण्याच्या उद्देशाने एका तरुणाने बस अडवून धुडगूस घातला. या प्रकाराला विरोध करणार्या बस चालकालाही आरोपीने मारहाण केली. शनिवार दि. 11 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही संपूर्ण घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेर्यात आणि चालकाच्या मोबाईलमध्ये कैद झाली असून, या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.