पुणे–बंगळुरू आशियाई महामार्गावर सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका दरम्यान विविध ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. या मार्गावर प्रवाशांना योग्य माहिती मिळावी यासाठी उभारण्यात आलेले माहिती दर्शवणारे, दिशादर्शक व सूचना फलक गेल्या काही दिवसांपासून खराब अवस्थेत असल्याने स्पष्ट दिसत नव्हते. परिणामी वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन महामार्ग देखभाल करणाऱ्या डी. पी. जैन कंपनीच्या सुरक्षा विभागाकडून संबंधित फलकांची साफसफाई केली आहे.