नागपूर शहर: मातोश्री नगर येथे रागाच्या भरात जवानाची हत्या, आरोपींना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी
5 एप्रिल ला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार मातोश्री नगर येथे एका पोलीस जवानाची हत्या केल्याप्रकरणी आई आणि तिच्या दोन मुलांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी महिला स्वतः ग्रामीण पोलीस विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहे.मृत जवान पंकज ठाकूर यांच्या मुलीवर आरोपी आकाश मंडल याचे एकतर्फी प्रेम होते. पंकज यांनी त्याला अनेकदा ताकीद दिली होती. घटनेच्या रात्री एका कार्यक्रमात आकाश दिसल्याने पंकज यांनी त्याला बेदम चोप दिला. याचा राग मनात धरून आकाश,