नागपूर शहर: ऑनलाईन गेमिंगच्या नादापायी वृद्ध मालकिणीला लुटले; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या: वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 11 एप्रिल ला दुपारी 12 वाजता दिलेल्या माहितीनुसार,ऑनलाईन गेमिंगचे व्यसन आणि त्यातून डोक्यावर चढलेले लाखो रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाने आपल्याच माजी मालकिणीला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हंसपुरी खदान परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक केली आहे.