नागपूर शहर: अल्पवयीन मुलांचा दारू न मिळाल्याने राडा; हेल्मेट घालून चाकूने हल्ला, ४ आरोपी ताब्यात: बाबूराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 19 मेला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये दारू खरेदी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ४ आरोपींना ताब्यात घेतले असून, यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.