नागपूर शहर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला नंदनवन पोलिसांकडून अटक: कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 23 मे ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,भीम चौक येथील रहिवासी अक्षय कुलमेथे याला नंदनवन पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा पीडित मुलगी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेली होती. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.