औंढा नागनाथ पोलिसांनी रात्री बेरात्री होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा धडाका सुरू केला असून दिनांक 15 नोव्हेंबर शनिवार रोजी भल्या पहाटे एक वाजेदरम्यान ब्राह्मणवाडा व धार फाटा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर वाहन ज्याची किंमत 29 लाख वीस हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करून वाळू सह सदरील टिप्पर वाहन औंढा नागनाथ पोलीस ठाणे आवारात आणून लावण्यात आली आहे कारवाई पोलीस निरीक्षक जी एस राहिरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, उपनिरीक्षक शेख खुदुस, सुभाष जयताडे, यांच्या पथकाने केली आहे