जिंतूर तालुक्यातील पांढरगळा परिसरात असलेल्या एका शेत शिवारात महावितरणच्या विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. या आगीत पांढरगळा गावालगत शेतकरी रामराव उत्तमराव कवडे यांच्या शेतातील सुमारे चार एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार १९ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.