नागपूर शहर: हुडकेश्वर परिसरात घातक शस्त्रासह फिरणाऱ्या आरोपीला अटक
24 मे ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त घालत असताना पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे.इरफान हमीद शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्या पँटच्या आत कंबरेला खोचलेला ५०० रुपये किमतीचा एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला.आरोपी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने चाकू बाळगून फिरत असल्यामुळे आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस पु