रावेर: सावदा शहरातील ख्वाजा नगर भागातील रहिवासी २७ वर्षीय विवाहिता बालकांसह बेपत्ता,सावदा पोलिसात हरवल्याची तक्रार
Raver, Jalgaon | Oct 22, 2025 रावेर तालुक्यात सावदा शहर आहे. या शहरात ख्वाजा नगर आहे. या ख्वाजा नगरातील रहिवाशी सुमैय्या अजहर खान वय २७ ही विवाहिता तिच्यासोबत तिचा मुलगा उजैफ खान वय ८ व उबैर खान वय ७ या दोघांना घेऊन कुठेतरी गेली आणि बेपत्ता झाली. या तिघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तिघे कुठेच मिळून आले नाही म्हणून सावदा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.