भंडारा शहरात सुरू असलेल्या एका देहविक्री अड्ड्याचा जिल्हा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला असून, या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. 10 जानेवारी रोजी भंडारा शहरातील विद्यानगर येथील संत ज्ञानेश्वर वॉर्डातील एका घरात अवैध देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला; यावेळी पंचांच्या उपस्थितीत एका बनावट ग्राहकाला पाठवून खातरजमा करण्यात...