नागपूर शहर: गंगा जमुना वस्तीत देहव्यापार करणाऱ्या मुन्नीबाईवर पोलिसांची कारवाई, पीडित महिलेची सुटका
नागपूरमधील लकडगंज परिसरातील गंगा जमुना वस्ती येथे देहव्यापारासाठी महिलांना प्रवृत्त करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे.२ जुलै रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली की, गंगा जमुना वस्ती, दिल्ली गल्ली येथील खत्री किराणा दुकानाजवळ मुन्नीबाई नावाची महिला पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून देहव्यापार करून घेत आहे.