मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.
पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी मुक्तिसंग्रामातील वीरांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नांदेड पोलीस दलाच्या वतीने शौर्य, त्याग आणि बलिदानाचे स्मरण करत आदरांजली वाहण्यात आली.
मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या प्रत्येक वीराला मानाचा मुजरा!
#marathwadamuktisangramdin #spofficenanded #nandedpolice #nandednews
Nanded, Maharashtra | Sep 18, 2026