सेलू: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा द्या सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
तीन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच आरोपींना कठोर शिक्षा मिळावी आणि अशा नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींना धडा मिळावा या मागण्यांसाठी सेलू शहरातील विविध क्षेत्रातील हजारो नागरिकांनी आज मंगळवार 7 ऑक्टोबर रोजी सकाळी सेलू शहरातील श्री लोकमान्य टिळक पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड असा मूक मोर्चा काढला या मोर्चा हजारो महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.