घनसावंगी: तीर्थपुरीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री ३० सोलार पंपांच्या केबलची चोरी
जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल २५ ते ३० शेतकऱ्यांच्या सोलार कृषी पंपांच्या केबलची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली असून मंगळवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर पंप सुरू न झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोलार पंपासाठी वापरण्यात येणाऱ्या केबल्स महागड्या असल्याने शेतकऱ्यांना हजारो र