तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील पनोरी येथील स्मशान भूमीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्ता झाली असल्याने या स्मशानभूमीवरील टीन पत्रे उडून गेले काही टीन पत्रे लटकलेल्या अवस्थेत असतांना अंत्यसंस्कार करतावेळी एखाद्याच्या अंगावर पडत मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वारा आल्यास स्मशानभूमीवरील टीन पत्रे व अँगल पडण्याची भीती व्यक्त होत असून प्रशासनाचे या स्मशानभूमीच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.