महागाव तालुक्यातील काळी दौ येथे वेगवेगळ्या ठिकाणांहून ७ शेतकरी व पशुपालकांची लाखो रुपये किमतीची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना दि. ७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर चोरीच्या घटनांमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.