लातूर: पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेच्या हस्ते लातूरात कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण;विद्यार्थ्यांनी मानले जरांगे यांचे आभार
Latur, Latur | Sep 17, 2025 लातूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकरीच्या संधींसाठी आवश्यक असलेली कुणबी जात प्रमाणपत्रे आता सुलभ पद्धतीने उपलब्ध होत असून, लातूरमध्ये आयोजित भव्य समारंभात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण सकाळी 10 30 वाजता करण्यात आले. अशी माहिती दिनांक 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान जिल्हा माहिती अधिकारी यांच्या वतीने देण्यात आली.