दापोली: मुरूड कोळीवाडा येथे वॉर्ड क्रमांक ८, ९ आणि १० मधील उमेदवारांसाठी संयुक्त प्रचार सभा
आज शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास मुरूड–जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मुरूड कोळीवाडा येथे वॉर्ड क्रमांक ८, ९ आणि १० मधील उमेदवारांसाठी संयुक्त प्रचार सभा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सभेला संबोधित करताना, मुरूड शहराशी असलेली अनेक वर्षांची ओळख आणि जिव्हाळा व्यक्त केला. पालकमंत्री असताना कोळी बांधवांसाठी देण्यात आलेले पॅकेज तसेच अर्थमंत्री म्हणून घेतलेले विविध क्रांतिकारी निर्णय यांची आठवण करून दिली.पद्मदुर्ग किल्ला आणि जंजिरा किल्ला यांसारख्या ऐतिहासिक स्थळांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ असते. मच्छीमारांसाठी २०१० मध्ये मांडलेला महत्त्वपूर्ण निर्णय आणि हा संपूर्ण किनारा मच्छीमारांचा बेल्ट असल्याचा उल्लेख करत, जशी मुंबईत ससून डॉक आणि भाऊचा धक्का आहे