नागपूर शहर: एसटी बस चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गणेशपेठ पोलिसांनी घेतले ताब्यात : तुकाराम ठाकरे, पोलीस निरीक्षक
गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम ठाकरे 5 जुलै ला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार,एसटी महामंडळाची बस चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्हेगाराने यापूर्वीही अशाच प्रकारे २० पेक्षा जास्त एसटी बस चोरल्याची माहिती समोर आली आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तांत्रिक तपास करून बसचा शोध घेतला. ही बस अमरावतीमधील राजापेठ येथे असल्याचे समजल्यानंतर राजापेठ पोलिसांनी कारवाई करत बस आणि आरोपीला ताब्यात घेतले.याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक तुक